वार्ताहर / यड्राव
समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या नादात उसाने भरलेला ट्रॅक्टर रस्त्यालगत असणार्या पानपट्टी घुसला सुदैवाने पानपट्टी चालकाने प्रसंगावधान राखत बाजूला झाल्याने पायाला किरकोळ दुखापत होण्यावर निभावले. इंचलकरंजी जयसिंगपूर रोडवरील पार्वती औद्योगिक वसाहतीजवळ संगमनगर चौकात दोन ट्रॉलीत ऊस भरून ट्रॅक्टर पंचगंगा साखर कारखाना कडे निघाला होता. याच दरम्यान अचानकपणे समोरून दुचाकीस्वार आला. त्याला वाचवण्याच्या नादात ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेलाच असणाऱ्या गजानन नरसाळे यांच्या पानपट्टी थेट घुसला. यावेळी नरसाळे पानपट्टीतच होते.
पण त्यांनी प्रसंगावधान राखत थेट उडी मारली. त्यामुळे सुदैवाने जीवित हानी टळली. मुख्य रस्त्यावर झालेल्या अपघाताने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती या घटनेची माहिती शहापूर पोलीस ठाणे यांना कळताच पोलिस उपनिरीक्षक गणेश खराडे, शशिकांत ढोणे, बापू खरजे, आसिफ शिराज भाई हे घटनास्थळी दाखल होऊन गर्दीला हटवून वाहतूक सुरळीत केली यावेळी अन्य एका टॅक्टर साह्याने अपघातग्रस्त ट्रॅक्टर ट्रॉली सुरक्षितपणे बाहेर काढले या वेळी पोलिस उपनिरीक्षक गणेश खराडे यांनी अपघातग्रस्त ट्रॅक्टर मधील शेतकऱ्यांच्या उसाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेत त्याच अपघातग्रस्त ट्रॅक्टर मधून उसाने भरलेले ट्रॉली पंचगंगा कारखान्यात पाठवला. ऊस साखर कारखान्यात पोहोचवून नंतर ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला घेऊन येण्याची सूचना दिली.