ऑनलाईन टीम / आग्रा :
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यासह काही जणांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, शेतकरी त्यावर समाधानी नाहीत. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनाही पदावरुन हटवण्यात यावे ही शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे. अन्यथा सोमवारी (दि.18) शेतकरी देशव्यापी रेल रोको करतील, असा इशारा संयुक्त किसान मोर्चाने दिला आहे.
शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले, लखीमपूर खेरी हिंसाचार घडविण्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी कोणती भूमिका निभावली याची चौकशी झाली पाहिजे. त्यांची अद्याप पोलिसांकडून चौकशी झाली नाही. त्यामुळे सरकारने त्यांना मंत्रिपदावरुन हटवावे. अन्यथा सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत शेतकरी प्रत्येक जिह्यात रेल रोको आंदोलन करतील.









