वार्ताहर / पंढरपूर
अन्न पदार्थाच्या आड लपवून सुगंधित तंबाखू व सुगंधित सुपारी वाहतूक करणा-या कुमठा नाका, सोलापूर येथील एकावरती नारायण चिंचोली ता.पंढरपूर येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने रविवारी कारवाई केली आहे. यामध्ये सुगंधी तंबाखू, रितिक स्वीट सुपारी व चंदन स्वीट सुपारीची ५७१ पाकीटे जप्त केली असून ३४ हजार ४०३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांना (एम एच १३ ए.एन. ०७८५) या वाहनातून राज्यात प्रितबंधित केलेला अन्नपदार्थांचा साठा वाहतुक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. नारायण चिंचोली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर या ठिकाणी पाठलाग करून वाहन पकडण्यात आले. सदर वाहनात विजय संतोष निरंकारी (वय २९) रा. १९ मार्कंडेय नगर, कुमठा नाका, सोलापूर, ही व्यक्ती आढळुन आली. यामध्ये त्याच्या मालकीचा सुगंधित तंबाखू व सुगंधित सुपारी इत्यादींचा एकूण ३४ हजार ४०३ किंमतीचा साठा अन्न पदार्थांच्या आड लपवून विक्रीसाठी वाहतूक करीत असल्याचे आढळुन आले.
सदर साठा जागेवर पंचनामा करून पंच साक्षीदार सिध्दराम नागेंद्र कडता यांच्यासमक्ष सील करून ताब्यात घेण्यात आला आहे. आरोपी विजय संतोष निरंकारी यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा शिक्षापात्र कलम ५९ व भा.द.वि. कलम १८८, २७२, २७३, ३२८ नुसार तालुका पोलीस ठाणे,पंढरपूर येथे फिर्याद दिली आहे. आरोपीने सदर प्रतिबंधित साठा कोठून आणला, कोणाला देणार होते, अजून कोठे साठा करून ठेवला आहे का, या व्यवसायातील भागीदार कोण आहे का याची माहिती मिळवण्यासाठी सरकारतर्फे प्रशांत कुचेकर, अन्न सुरक्षा अधिकारी, सहाय्यक आयुक्त यांचे कार्यालय, अन्न व औषध प्रशासन, सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे.
सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी सहाय्यक आयुक्त (अन्न) प्र. मा. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा कायद्याचे तंतोतंत पालन करूनच व्यवसाय करावा, अन्यथा अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाईची पावले उचलण्यात येणार आहेत असे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









