ओटवणे/ प्रतिनिधी:
कोलगाव कासारवाडी येथील रहिवासी सौ अन्नपूर्णा चिंतामणी पित्रे (७८) यांचे बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत पित्रे कुटुंबीयांचे सांत्वन केले. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक चिंतामणी पित्रे यांच्या त्या पत्नी होत तर सावंतवाडी येथील अन्नपूर्णा एजन्सी या फार्मास्युटिकल डिस्ट्रीब्यूटरचे पार्टनर श्यामप्रसाद पित्रे यांचे यांच्या त्या मातोश्री होत.
Previous Articleपुणे – बेंगळूर महामार्गावर विचित्र अपघात; वाहतूक विस्कळीत
Next Article मुकुंद तिळवे यांचे निधन









