प्रतिनिधी / व्हनाळी
कष्टकरी शेतक-यांच्या हक्काचा अन्नपूर्णा शुगर अण्ड जॅागरी वर्क्स लि. केनवडे ह्या कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम शुभारंभ लवकरच सुरू होणार असून कारखान्याचे कामकाज प्रगतीपथावर सुरू असून अल्पावधीतच ह्या कारखान्याच्या प्रत्यक्ष गाळपाला सुरूवात होणार आहे. शिवाय उसाला इतर साखर कारखान्याप्रमाणे समाधानकारक दर ही मिळणार आहे. त्यामुळे ऊसउत्पादक शेतकरी बांधवांचे कल्याण होणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार व अन्नपूर्णा शुगरचे संस्थापक अध्यक्ष संजय घाटगे यांनी केले
ते अन्नपूर्णा शुगर अंड जागरी वर्क्स लिमिटेड केनवडे ता कागल येथील कारखाना चिमणी शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक,जि.प,सदस्य अंबरिषसिंह घाटगे होते. यावेळी अन्नपूर्णा शुगर अॅड. जागरी वर्क्स साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर चिमणी उभारणीचा शुभारंभ विधीवत पुजन गोकुळच्या माजी संचालिक अरूंधती घाटगे व संस्थापक संजय घाटगे यांचे हस्ते संचालकांच्या उपस्थीत करण्यात आले.
अन्नपुर्णा कारखाना उभारणीचे कामकाज 95 टक्के पुर्ण
केनवडे येथील अन्नपूर्णा शुगर कारखान्याच्या साईटवरील रस्ते,पाणी पुरवठा,वहानतळ व कारखाना उभारणीचे कामकाज 95 टक्के पूर्ण झाले असून यंदा वेळेत गळीत हंगाम सुरू करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. येत्या पंधरा दिवसातच बॉयलर चा शुभारंभ होणार होऊन महिन्याभरात कारखाना पुर्णक्षमतेचे सुरू होणार असल्याचे संजय घाटगे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमासाठी संचालक दत्तोपंत वालावलकर, स्वागत जनसंपर्क अधिकारी सिद्राम मांडरेकर तर आभार उत्तम पाटील यांनी मानले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









