रेल्वे बसथांब्यावरील घटना
प्रतिनिधी / बेळगाव
रेल्वेस्थानकासमोरील बसथांब्यावर झोपेत असतानाच एका अनोळखी तरुणीचा मृत्यू झाला आहे. कॅम्प पोलिसांनी सुमारे 25 ते 30 वषीय तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
शनिवार दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते दुपारी 1 या वेळेत बसथांब्यावर झोपेत असतानाच तिचा मृत्यू झाला आहे. 4.8 इंच उंची, गहू वर्ण, लांब नाक असे तिचे वर्णन आहे. वरील वर्णनाच्या तरुणीविषयी कोणाला माहिती मिळाल्यास 0831-2405255 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









