पैलवानांच्या कुशीत रडतात छोटी मुले
आईवडिल स्वतःच्या मुलांसाठी काहीही करण्यास तयार असतात. पालक स्वतःच्या मुलांना त्रास देण्याचा विचारही करू शकत नाहीत. परंतु जपानच्या नाकी सूमो कार्यक्रमात आईवडिल स्वतःच्या मुलांना रडविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात.
400 वर्षे जुना नाकी सूमो फेस्टिव्हल जपानमध्ये दरवर्षी साजरा करण्यात येतो. हा महोत्सव मुलांना वाईट आत्म्यांपासून वाचवितो आणि त्यांना चांगले आरोग्य तसेच भाग्य प्रदान करतो असे मानले जाते. सूमो पैलवान स्पर्धेदरम्यान मुलांना पकडून आणि चित्रविचित्र आवाज काढून त्यांना रडविण्याचा प्रयत्न करतात. जे मूल सर्वप्रथम रडते, ते या स्पर्धेत विजयी ठरत असते.

या महोत्सवामुळे नवजातांना चांगले आरोग्य मिळते असे मानले जाते. आम्ही मुलाच्या रडण्याच्या पद्धत ऐकून त्याच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल सांगू शकतो. मी त्याचे जोरजोराने रडणे ऐकू इच्छिते असे एका महिलेने म्हटले आहे. क्राइंग सुमो फेस्टिव्हल आईवडिल आणि प्रेक्षकांसाठी देशभरातील मंदिरांमध्ये आयोजित केला जातो.
काही लोक मुलांना रडविण्याचा प्रकार भयानक असल्याचा विचार करू शकतात. परंतु जी मुले जोरात रडतात ती अधिक उत्तमप्रकारे मोठी होत असतात, असे असाकुसा टुरिझम फेडरेशनचे अध्यक्ष शिगेमी फूजी यांनी सांगितले आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचे नियम क्षेत्रानुसार वेगवेगळे असतात. काही ठिकाणी आईवडिलांना स्वतःचे मूल सर्वप्रथम रडावे असे वाटत असते. तर काही ठिकाणी सर्वप्रथम रडणारे मूल पराभूत मानले जाते.









