बेंगळूर/प्रतिनिधी
समाजकल्याण मंत्री बी. श्रीरामुलू यांनी जाहीर केले की, भाजपाप्रणित सरकार अनुसूचित जमातीसाठी आरक्षण ३ टाक्यांवरून वरून ७.५ टक्के करेल.
मंगळवारी हरिहर तालुक्यातील राजनहळ्ळी येथे वाल्मिकी गुरुपीठाने आयोजित वाल्मिकी कार्यक्रमात ते बोलत होते.
श्रीरामुलू यांनी इतर अनेक समुदाय राज्यात आरक्षण लाभासाठी लढत आहेत, परंतु वाल्मिकी नायक समुदायाच्या लोकांनी संयम राखला पाहिजे. परंतु वाढीव आरक्षणाची ही मागणी फोल न होता पूर्ण केली जाईल असे ते म्हणाले. दरम्यान समाजातील नेत्यांमध्ये एकता नाही, यामुळे त्यांची प्रगती रोखली जात आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.