ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात आली आहे.
अनुराग ठाकूर यांच्यावर 72 तासांसाठी प्रचार कार्यक्रमात सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. याचबरोबर भाजपाचे खासदार परवेश वर्मा यांच्यावर देखील 96 तासांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, या अगोदर निवडणूक आयोगाकडून अनुराग ठाकूर व परवेश वर्मा यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून हटवण्याचा आदेश भाजपाला देण्यात आला होता. दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात या दोघांनी वादग्रस्त विधाने केली होती.









