संचारबंदीचे तंतोतंत पालन, शहर झाले सुनसान
सातारा : अनुमानित म्हणून दाखल होणाऱयांचा आकडा वाढल्याने शहरात संचारबंदीचे तंतोतंत पालन केले जात आहे.
सातारा / प्रतिनिधी
कोरोना बाधितांचा आकडा देशासह राज्यात वाढतच असताना दिसत आहे. सातारा जिह्यातही आजपर्यंत दोन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असले तरी विलगीकरण कक्षात दाखल होणाऱया अनुमानित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस डबल होत आहे. त्यामुळे या वाढत्या आडक्यांची धास्ती सातारकरांनी घेतली असल्याची दिसत आहे. त्यामुळे साताऱयात मोकाट फिरणाऱयांची संख्या कमी झाली आहे. रस्ते अक्षरशः सुनसान होवू लागले आहे. ठिकठिकाणी बॅरिकेट लावण्यात आल्यामुळे आवश्यक असेल तरच नागरिकांना सोडले जात आहे. सातारकर संचारबंदीचेज् पालन करताना दिसत आहेत.
सातारा जिह्यात जिल्हा शासकीय रुग्णालय व कृष्णा हॉस्पीटल, कराड या दोन ठिकाणी विलगीकरण कक्षांची उभारणी करण्यात आली आहे. येथील जिह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा जरी दोनवर थांबला असला तरी विलगीकरण कक्षात दाखल होणाऱया अनुमानित रुग्णांचा आकडा रोजच वाढताना दिसत आहे. या वाढत्या आकडय़ाने सातारा शहरातील नागरिक मात्र चांगलेच धास्तावलेले दिसत आहेत. विनाकारण फिरणाऱयांना काहीसा लगाम बसला असून सूज्ञ नागरिक स्वतःच योग्यती खबरदारी घेताना दिसत आहेत.
त्याचबरोबर संपूर्ण देशासह जिह्यात सुरु असलेला लॉकडाऊन पूर्ण शिस्तीने पाळला जात आहे. नागरिकांमध्ये कोरोनाविषयी धास्ती वाढत असून त्यांच्यामध्ये काही प्रमाणात जनजागृती झाल्याने त्याची अंमलबजावणी करताना नागरिक दिसत आहेत. रस्ते पूर्णतः ओस पडू लागले असून नागरिक मास्कचा वापर सर्रास करताना दिसत आहेत. घराबाहेर पडतानाही नागरिक योग्यती खबरदारी घेत असून शक्यतो घरीच राहणे नागरिकांनी पसंद केल्याचे चित्र आहे. आजपासून रेशनिंगचे वितरण सुरू झाल्यामुळे रेशनिंग दुकानासमोर नागरिकांची गर्दी आहे मात्र तेथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे.









