नवी दिल्ली
अनुपम रसायनने दिलेल्या माहितीनुसार कंपनीला रसायन पुरवठा करण्यासाठी दोन बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून 540 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. अनुपम रसायनने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार जीवन विज्ञान रसायन क्षेत्रात काम करणाऱया सदरच्या कंपन्या असल्याचेही स्पष्ट केले आहे. या कंत्राटासाठी दोन्हीकडून करार करण्यात आला असून त्यावर हस्ताक्षर करण्यात आल्याची माहिती यावेळी दिली आहे.









