मुंबई / ऑनलाईन टीम
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख केंद्रीय अन्वेषण विभागाकडून होणाऱ्या चौकशीसाठी हजर झाले आहेत. डीआरडीओ गेस्ट हाऊसवर अनिल देशमुख यांची चौकशी होणार आहे. सीबीआयचे अधिकारी देखील पोहोचले आहेत. अनिल देशमुख यांना चौकशीसाठी सीबीआयकडून समन्स बजावण्यात आलं होतं.
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्यास १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा दावा सिंग यांनी पत्रात केला होता.
Previous Articleकर्नाटकात सक्रिय रुग्णांची संख्या ७८ हजारावर
Next Article देशात पुन्हा लॉकडाऊन? अर्थमंत्री म्हणाल्या..








