ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची याचिका फेटाळली आहे. आपल्या विरोधात कोणतीही कारवाई करू नये यासाठी अनिल देशमुख यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेत वेगवेगळय़ा मागण्या केल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने अनिल देशमुख यांना दणका बसला आहे.
देशमुख यांनी आपल्या याचिकेमध्ये प्रामुख्याने तपासाला स्थगिती द्यावी, ईडीकडून पाठवण्यात आलेले समन्स रद्द करावे, अटकेसारखी गंभीर कारवाई करण्यास मज्जाव करावा अशा या मागण्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा एकदा देशमुख यांची याचिका फेटाळली आहे.
मनी लॉड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी त्यांना अनेक वेळा समन्स पाठविण्यात आले होते. या प्रकरणात त्यांच्या दोन स्वीय सहायकांना कोठडी सुनावण्यात आली आहे. 4 जुलै रोजी अनिल देशमुखांनी ही विनंती याचिका दाखल केली होती. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडी चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लागल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने याचिका रद्द केली आहे.









