100 कोटी वसुली प्रकरणी आरोपाची केली चौकशी
प्रतिनिधी/मुंबई
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) 100 कोटी रुपये वसुली प्रकरणी साडे आठ तास चौकशी केली. त्यांच्यावर पोलीस अधिकार्यांना खंडणी वसूल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप आहे. याबाबत सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. या आरोपामुळेच देशमुखांना मंत्रिपद सोडावे लागले होते.
निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गफहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकार्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकार्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकार्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकार्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकार्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकार्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.
या चौकशीवेळी सिंग यांच्या आरोपांबाबत देशमुख याबाबत प्रश्न विचारण्यात आले. तसेच वाझेला वसुलीसाठी टार्गेट देण्यात आले होते का, याबाबतही विचारणा करण्यात आली. इतर अधिकाल्ल्यांनाही अशा प्रकारे टार्गेट देण्यात आले होते का, याबाबत कोणाचा दबाव होता का, आदी आरोपांबाबत विचारणा करण्यात आली









