मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्याचे विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा सोमवारी, आज प्रथम दिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन केवळ २ दिवसांचे ठेवण्यात आले आहे. अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी गदारोळ झाल्याचं पहायला मिळालं. संसदीय आयुध गोठवण्याचे काम कोणत्याही विधानसभेने केले नाही असा मुद्दा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या कामकाजाच्या सुरूवातीलाच उपस्थित केला. सरकारने सरसकट आयुध गोठवून टाकले, आपण ६१ व्या वर्षी मागे चाललोय की पुढे चाललोय असेही फडणवीस यावेळी म्हणाले. बीएससीला आयुध गोठवण्याचा अधिकार नाही, लोकशाहीला कुलूप लावण्याचा हा प्रकार आहे. व्यपगत केलेले प्रश्न अतारांकित करावेत आणि आयुध वापरण्याचा अधिकार द्यावा अशीही विनंती त्यांनी सभागृहात केली. त्यानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाराच्या मुद्द्यावर बोलताना भास्कर जाधव आणि मुनगंटीवार यांच्यात चांगलेच खटके उडाले. मुनगंटीवार यांनी बोलताना सांगितले की, मधे बोलल्यानेच अनिल देशमुख जेलमध्ये चालले आहेत. जेलचा उल्लेख केल्यामुळे विधानसभेत एकच गोंधळ पहायला मिळाला.
या सगळ्या प्रकारानंतर अनिल देशमुख यांना जेलमध्ये पाठवण्याची धमकी देता का ? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांना डिवचत म्हटले होते की, भास्कर जाधव खूपच अस्वस्थ आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना महत्वाचे पद द्यावे किंवा एखादे मंत्रीपद द्यावे. त्यानंतर बोलताना मुनगंटीवार यांनी सांगितले की, सरकारची चमचेगिरी भास्कर जाधव यांनी करू नये. मधे बोलू नये नाही तर अनिल देशमुख यांच्यासारखे जेलमध्ये जावे लागेल असा चिमटा मुनगंटीवार यांनी लगावला. त्यावर नाना पटोले यांनी हरकत घेत धमकी देत आहात का ? असा सवाल यावेळी केला.
या मुद्यावर भास्कर जाधव यांनीही मला संरक्षण मिळावे. भाजपकडून सगळ्या यंत्रणा वापरून घाबरवण्याचा प्रकार सुरू आहे. ईडी, एनआयए, सीबीआय यासारख्या अनेक यंत्रणांचा वापर करत भाजपकडून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळेच मला या प्रकरणात संरक्षण द्यावे अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी देखील हरकत घेताना म्हटलं की, एखादा आमदार सत्ताधारी पक्षाचा असेल तर त्याला बोलण्याचा अधिकार आहे. मुनगंटीवार यांनी चमचेगिरी सुरु आहे का असा उल्लेख करणं योग्य नाही. हे शब्द रेकॉर्डवरुन काढून टाकावेत. यापुढे असं बोलणार नाही असी समज देखील द्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








