मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखांना ई़डीने चौकशीसाठी आज सकाळी 11 वाजता मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील विविध बार, रेस्टॉरंट्सकडून दरमहा 100 कोटी रुपयांचे वसुली करण्याचे पोलीस अधिकाऱ्यांना आदेश देण्याचा आरोप आहे.
अनिल देशमुखांनंतर ईडीने ऋषिकेश देशमुखांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. वसुली प्रकरणातील चौकशीपासून आपल्याला दिलासा मिळावा म्हणून अनिल देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली असून या आठवड्यात त्यावर सुनावणी होणार आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपये वसुल करण्याचा आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अनिल देशमुखांवर सीबीआय आणि ईडीने गुन्हा नोंद केला होता.
Previous Articleसांबा : लष्कराच्या छावणीजवळ 4 संशयित ड्रोनचा वावर
Next Article सलग दुसऱ्या दिवशी बाधित वाढ मंदावली








