मुंबई / ऑनलाईन टीम
अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणाऱ्या कुंदन आणि पालांडे यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. सीबीआयकडून रविवारी या दोघांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता या चौकशीतून कोणती माहिती समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सीबीआयने याप्रकरणात नुकतीच परमबीर सिंग आणि समाज सुधारक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांची चौकशी केली होती. त्यावेळी पालांडे यांनीच संजय पाटील आणि डीसीपी राजू पाटील यांना १०० कोटी रुपये वसूल करण्यासंदर्भात सांगितले होते, अशी माहिती परमबीर सिंग यांनी सीबीआयला दिली होती.
प्रत्येक बारकडून २ ते ३ लाख रुपये वसूल झाले पाहिजेत, अशी अनिल देशमुख यांची अपेक्षा असल्याचे पालांडे यांनी दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यामुळे आता पालांडे सीबीआयच्या अधिकाऱ्यांसमोर याबाबत काय स्पष्टीकरण देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








