वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
युरोपमध्ये झालेल्या दोन विविध स्पर्धांमध्ये भारताचा अनिमेश कुजूरने 100 मी. धावण्याच्या शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम केला. ग्रीसमध्ये झालेल्या या स्पर्धेत 100 मी. धावण्याच्या शर्यतीत कुजूरने 10.18 सेकंदाचा अवधी घेत यापूर्वी गुरुविंदर सिंगने नोंदविलेला 10.20 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम मागे टाकला.
त्याचप्रमाणे ग्रीसमधील दुसऱ्या एका स्पर्धेत कुजूरने 100 मी. धावण्याच्या शर्यतीत 10.20 सेकंदाचा अवधी नोंदविला. या स्पर्धेत ग्रीसचा गॅरेगेनिस दुसऱ्या तर सॅम्यूलेसनने तिसरे स्थान मिळविले. आता अनमेश कुजूरने 100 आणि 200 मी. धावण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रम नोंदविला आहे.









