ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेत्री अनिता हसनंदानीच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. 9 फेब्रुवारी रोजी अनिताने एका मुलाला जन्म दिला आहे. अनिताचा पती रोहित रेड्डीने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना बाबा झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे. चाहत्यांनी आणि कलाकारांनी त्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

रोहित रेड्डीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीला काही फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये अनिता दिसत आहे तर दुसऱ्या एका फोटोमध्ये फोनच्या स्क्रीनवर बाळाचा चेहरा दिसत आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनितासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर 9 फेब्रुवारी 2021 ही तारीख टाकण्यात आली आहे तसेच मुलगा झाला असे देखील लिहिले आहे. अनिताच्या या पोस्टवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, अनिताने ‘नागिन 4’ या मालिकेत काम केले होते. तिने विशाखा खन्नाची भूमिका साकारली होती. तसेच ‘नच बलिए 9’मध्ये त्या दोघांनी भूमिका साकारली होती. तसेच तिने ये हैं मोहब्बतें, कव्यांजली, क्योंकि सास भी कभी बहू थी आणि कसम या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.









