प्रतिनिधी / जय उत्तम नाईक
’अनादर राऊंड’ या थॉमस विंटरबर्ग (डेन्मार्क) यांच्या चित्रपटाच्या इंडियन प्रिमियरने 51व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पडदा उघडणार आहे. दि. 24 रोजी कियोशी कुरोसावा दिग्दर्शित ’वाईफ ऑफ अ स्पाय’ या जपानी ऐतिहासिक चित्रपटाच्या इंडियन प्रिमियरने आंचिमचा समारोप होणार आहे. व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला ’बॅस्ट सिल्वर लायन’ पुरस्कार प्राप्त झाला होता. त्याचबरोबर संदीप कुमार (ऑस्ट्रिया) दिग्दर्शित ’मेहरुनिसा’ चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमियर या महोत्सवात होणार आहे. एका महिलेच्या प्रदीर्घ स्वप्नांना पंख देणाऱया कथानकावर हा चित्रपट आधारित आहे.
दि. 16 जानेवारी आंचिमचे उद्घाटन होणार असून 9 दिवस चालणाऱया महोत्सवात विविध स्पर्धांमधील चित्रपटांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निकोलास माऊरी (फ्रान्स) यांचा ’माय बॅस्ट पार्ट’, कामेन कालेव्ह (बल्गेरिया) यांचा ’फेब्रुवारी’, पिओत्र डोमालेस्विकी (पोलंड) यांचा ’आय नेव्हर क्राय’ लिओनार्दो मेडेल (चिली) यांचा ’ला व्हेरोनिका’, शिन शू वॉर्न (दक्षिण कोरीया) यांचा ’लाईट फॉर द यूथ’, लुईस पाटिनो (स्पेन) यांचा ’रेड मून टाईड’, अली घाविटान (इराण) यांचा ’ड्रिम अबाऊट सोहराब’, रामिन रासौली (अफघानीस्तान, इराण) यांचा ’द डॉग डिडन्ट स्लीप लास्ट नाईट’, को चेन नियन (तैवान) यांचा ’द सायलेंट फॉरेस्ट’, दारिया ऑनिश्चेंको (युक्रेन, स्वित्झर्लंड) यांचा ’द फॉरगॉटन’, टियागो ग्युडेस (पोर्तुगाल) यांचा ’द डोमेन’, अँडर्स रेफ्न (डेन्मार्क) यांचा ’द डार्कनेस’, हे विदेशी चित्रपट तर गणेश विनायकन यांचा ’थाईन’, यासारखे भारतीय चित्रपट सहभागी होणार आहेत.
’इंडियन पॅनोरमा’ मध्ये एकूण 23 फिचर फिल्म आहेत. त्यात क्रिपाल कालिता यांचा ’ब्रिज’, मधूर भंडारकर निर्मित ’अविजात्रिक’ अरित्रा मुखर्जी यांचा ’ब्रह्मास जेने गोपोन कोमोती’ (बंगाली), सिद्धार्थ त्रिपाठी यांचा ’अ डॉग ऍण्ड हिज मॅन’, गोविंद निहलानी यांचा अप अप अँड अप (इंग्लिश), दुर्बा सहाय यांचा आवर्तन (हिंदी), तुषार हिरानंदानी दिग्दर्शित ’सांड की आंख’, पिंकी इल्ली (कन्नड), सेफ (मल्याळम), ट्रान्स (मल्याळम), केट्टीयोलानू येन्टे मलाखा (मल्याळम), ताहिरा (मल्याळम), इगी कोना (मणिपुरी), जुने (मराठी), प्रवास (मराठी), कारखानीसाची वारी (मराठी), कलिरा अतिता (ओरिया), नमो (संस्कृत), थाईन (तामीळ), गाथम (तेलगू), असुरन (तामीळ), कप्पेला (मल्याळम) व छिछोरे (हिंदी) यांचा समावेश आहे.
’नॉन फिचर’ गटात 20 चित्रपट आहेत. त्यात 100 इयर्स ऑफ ख्रिसोटॉम (इंग्लिश), अहिंसा-गांधी (इंग्लिश), पॅटडॉग (हिंदी), ड्रामा क्वीन्स (इंग्लिश), ग्रीन ब्लॅकबेरी (नेपाली), हायवेस ऑफ लाईफ (मणिपूरी), होली रायटस् (हिंदी), इन अवर वर्ल्ड (इंग्लिश), ’इन्वेस्टिंग लाईफ’ (इंग्लिश), जादू (हिंदी), झट आई बसंत (पहाडी-हिंदी), जस्टिस डिलेड बट डिलिव्हर्ड (हिंदी), खिसा (मराठी), ओरू पाथिरा स्वप्नम पोले (मल्याळम), पंचिका (गुजराती), पांढरा चिवडा (मराठी), राधा (बंगाली), शांताबाई (हिंदी), स्टील अलाईव्ह (मराठी), द फॉर्टिन्थ फेब्रुवारी अँड बियाँड (इंग्लिश) या चित्रपटांची निवड झाली आहे.
विविध दिवंगत अभिनेते, दिग्दर्शक यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. त्यात आठ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते ओडिया दिग्दर्शक स्व. मनमोहन महापात्रा यांचा ’व्हॅट हॅवन’, ओडिया अभिनेता स्व. अजित दास यांचा ’तारा’, अभिनेता स्व. बिजय मोहंती यांचा ’चिलिका तिरे’ हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. स्व. सुशांतसिंह राजपूत अभिनित ’छिछोरे’ चित्रपटही दाखविण्यात येणार आहे.