वृत्तसंस्था/बर्मिगहॅम
सोमवारी येथे झालेल्या ब्रिटीश खुल्या कनिष्ठांच्या स्क्वॅश स्पर्धेत भारताची महिला स्क्वॅशपटू अनहात सिंगने 13 वर्षांखालील मुलींच्या वयोगटात उपविजेतेपद पटकाविले.
या गटातील अंतिम लढतीत इजिप्तच्या टॉप सीडेड अमिना ओरफीने अनहात सिंगचा 11-0, 11-1, 11-4 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत मुलांच्या 19 वर्षांखालील वयोगटात भारताच्या वीर चोटरानीचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले.









