ऑनलाईन टीम/नवी दिल्ली
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केंद्र सरकारनं देशात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. तब्बल चार महिन्यानंतर यात केंद्रसरकारने अंशता शिथीलता दिली. यामुळे काही प्रमाणात जनजीवन पुर्वपदावर येत आहे. राज्य सरकारने देखील काही अंशी यात शिथीलता दिली आहे.
वाहतुकीच्या संब्ंधी मात्र अजून देखील जिल्हा अंतर्गतच वाहतूक सुरू आहे. यावरूनच राज्यातील आणि राज्याराज्यातील प्रवासी व मालवाहतुकीवरील बंदीवरून केंद्रानं राज्यांना फटकारलं आहे. त्याचबरोबर ही बंदी उठवण्याचे आदेश दिले आहेत.केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी प्रवासी व मालवाहतूक सुरू करण्यासंदर्भात पत्र लिहून निर्दश दिले आहेत.
या पत्रात म्हटलं आहे की, “केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अनलॉक-३ च्या नियमावलीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. राज्यातंर्गत वा राज्याराज्यातील वाहतुकीवर कोणत्याही प्रकारची बंधन असायला नको,” असं स्पष्ट केले आहे. तर, केंद्रीय गृहसचिव भल्ला यांनी राज्यांना अनलॉक ३ नियमावलीचा संदर्भही दिला आहे. अनलॉक-३ नियमावलीतील पाचव्या परिच्छेदाचा उल्लेख करत म्हटलं आहे की, “प्रवासी आणि माल वाहतुकीवर कोणतीही बंधन असणार नाही. त्याचबरोबर शेजारील देशांशी करारानुसार सीमापार व्यापार करण्यासाठीही स्वतंत्र परवानगी व ई-परमिटची गरज भासणार नाही, असंही स्पष्ट केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









