अचूक बातमी “तरुण भारत” ची, मंगळवार, 8 जून 2021, सकाळी 11.15
● सोमवारी रात्री 875 जण बाधित● जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 9.75● 8,750 जणांचे नमुने तपासले● जिल्ह्यात 2,274 बेड शिल्लक● प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये 2,546 रुग्ण● मृत्यू दरात घट झाल्याचा दिलासा
सातारा / प्रतिनिधी :
कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने कोरोनापासून संरक्षण झाले मात्र त्याचे इतर सामाजिक आर्थिक परिणाम खूप वेगळे झालेले आहेत. त्यामुळेच सातारकरांचा लॉकडाऊनला विरोध वाढू लागला होता. यामध्ये कोणीही लोकप्रतिनिधी पुढाकार घेत नव्हते. त्यामुळे लॉकडाऊन चे भूत मानगुटीवर बसले होते. याच काळात हजारोंच्या संख्येने बाधीत वाढ झाली. मात्र तीच बाधित वाढ आता गेल्या दोन-तीन दिवसापासून पूर्णपणे मंदावत चालली असून सोमवारी रात्रीच्या अहवालात फक्त 875 एवढ्या कमी संख्येनं बाधित समोर आले आहे. ही स्थिती सर्वांसाठी निश्चितपणे दिलासादायक आहे.
खूप दिवसांनी वाढ आली तीन अंकावर
सातारा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग अद्याप हजारांच्या पटीत शिल्लक आहे. बाधित वाढीने दोन हजारांचा रतीब बंद करून आता एक हजार संख्येचा रतीब सुरू केला आहे. मात्र वेग मंदावला याचा दिलासा मिळत असतानाच सोमवारी रात्रीच्या अहवालात 875 एवढ्या कमी संख्येने खूप दिवसांनी बाजी तोड समोर आली आणि ती निश्चितपणे भीती कमी करणारी आहे. तरी गेल्या दोन महिन्यात खेळ किती विचित्र असतो याची प्रचिती गेल्या महिन्यात जिल्हावासीयांना घेतली आहे मात्र आता लॉकडाऊन थोडा तरी शिथिल केल्याने थोडासा सुटकेचा निश्वास टाकला आहे. तर काल बळींचे आकडे कमी होते मात्र ते थांबले नाहीत याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
लॉकडाऊन मध्ये वाढ, अनलॉकमध्ये घट
मार्च महिन्यापासून बाधित संख्या वाढू लागली. एप्रिल महिन्यात शेवटी लॉकडाऊन करावा लागला. त्यानंतर कडक लॉकडाऊन करावा लागला. तरी बाधित वाढीचा रतीब थांबत नव्हता. आकडेवारीच्या फुगवत यामुळे जिल्ह्यात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच लोक आपापल्या घरात बसून होती. मात्र अनलॉक केल्यानंतर बाधित वाढीत होत असलेली घसरण निश्चितपणे दिलासादायक आहे आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारलेल्या प्रश्नांची जंत्री किती समर्पक आहे. याची वास्तवता हे आकडे दर्शवत आहेत.
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 9.75
सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार 8,750 जणांचे नमुने तपासण्यात आल्यानंतर 875 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामध्ये जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 9.75 नमूद करण्यात आलेला आहे. यामध्ये 7,189 जणांची अँटीजन टेस्ट करण्यात आलेली आहे. यामध्ये 643 जणांचा अहवाल बाधित असून 8.94 असा पॉझिटिव्ह दर आहे. तर 1,781 जणांची rt-pcr टेस्ट करण्यात आली असून यामध्ये 232 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे त्यामुळे rt-pcr नुसार पॉझिटिव्हिटी रेट 13.03 एवढा कमी आला आहे.
जिल्हय़ात 2,470 बेड रिक्त
आजमितीस जिल्हय़ात कोव्हिड हॉस्पिटल्समध्ये 4,880 एकूण बेड संख्या आहे. यामध्ये प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2,410 एवढी असून हॉस्पिटलमध्ये 2,334 बेड रिक्त आहेत. कोव्हिड हॉस्पिटल्समध्ये आयसीयू व्हेंटीलेटरसह 43 बेड, आयसीयू व्हेंटिलेटरविना 181, ऑक्सिजनसह 1,664 बेड आणि ऑक्सिजनविना 582 असे 2,470 बेड रिक्त आहेत.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने 8,65,142 एकूण बाधित 1,75,788 एकूण कोरोनामुक्त 1,57,944 मृत्यू 3,887 उपचारार्थ रुग्ण 13,905
सोमवारी जिल्हय़ात बाधित 1,196 मुक्त 2,736बळी 21









