बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णांचा वेग कमी होत आहे. दरम्यान राज्यातील काही जिल्हे लॉक तर काही जिल्हे अनलॉक आहेत. ज्या जिल्ह्यात कोरोना सकारात्मकता दर ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे ते जिल्हे अनलॉक करण्यात आले आहेत. तर ज्या जिल्ह्यात अजूनही कोरोना सकारात्मकता दर जास्त आहे अशा ११ जिल्ह्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान जेंव्हा संपूर्ण राज्य अनलॉक होईल तेव्हा राज्यात परत येणाऱ्या स्थलांतरित मजुरांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिले आहेत.
दरम्यान अनलॉकनंतर राज्यात परत येणाऱ्या स्थलांतरित मजुरांची कोरोना चाचणी करावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी शक्य त्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लॉकडाऊननंतरही कोरोना सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात परतणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. यासंदर्भात मी आरोग्य विभागाला सूचना दिली आहेत, असे ते म्हणाले.









