ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. आज संसर्ग रुग्णांची संख्या 250 पेक्षा कमी आली आहे. ताज्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात केवळ 231 नवे रुग्ण आढळून आले असून 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 876 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 29 हजार 475 वर पोहोचली आहे. त्यातील 13 लाख 99 हजार 640 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर 24,627 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून राजधानीत रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. सद्य स्थितीत संसर्ग दर 0.36 % इतका आहे.
सद्य स्थितीत 5 हजार 208 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 98 लाख 21 हजार 925 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील 50,139 आरटीपीसीआर टेस्ट आणि 13,471 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 11,420 झोन आहेत.
- मागील 24 तासात 15,705 जणांचे लसीकरण
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत मागील 24 तासात 15,705 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 14,846 जणांना पहिला डोस तर 859 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 56 लाख 66 हजार 524 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यातील 43,80,848 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 12,85,676 नागरिकांना दुसरा डोस घेतला आहे.