आमदार आर. व्ही. देशपांडे यांच्या अधिकाऱयांना सूचना
वार्ताहर / रामनगर
गोवा-बेळगाव महामार्गावरील तिनईघाटपासून अनमोडपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब असल्याने येथील गावांना ये-जा करणे त्रासदायक होत आहे. वाहनेही रस्त्यावर अडकत असल्याने रस्त्यावर खडी घालून गोवा येथील नागरिकांनी काही प्रमाणात रस्त्याची दुरुस्ती केली आहे. परंतु, हा रस्ता व्यवस्थित दुरुस्त करावा, यासाठी हल्याळ-जोयडय़ाचे आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी जोयडा येथे घेण्यात आलेल्या बैठकीत गुरुवारी सदर मार्गाची बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांसमवेत जोयडा तहसीलदारांनी पाहणी करून सात दिवसांच्या आत दुरुस्त करण्याची सूचना केली आहे. याचबरोबर असू पंचायत क्षेत्रातील चांदेवाडी ब्रिजजवळून काढण्यात आलेला मार्ग वाहून गेल्याने त्या ठिकाणची पाहणी करून नागरिकांच्या समस्या निवारण्याच्याही सूचना केल्या आहेत.
या बैठकीपूर्वी जोयडा सरकारी इस्पितळाला आर. व्ही. देशपांडे यांच्यामार्फत एक्स-रे मशीन, जोयडा तालुक्मयाला सर्पदंशावरील तीस इंजेक्शन, तसेच कोरोनावर उपचारासाठी 15 हजार 900 गोळय़ा दवाखान्याला देण्यात आल्या. तसेच यावेळी अंगणवाडी कार्यकर्त्यांना कोरोना किटचे वितरण करण्यात आले.
यावेळी रामनगर जि. पं. सदस्य संजय हणबर, जोयडा जि. पं. सदस्य रमेश नाईक, जोयडा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सदानंद दबगार, जोयडा तहसीलदार संजय कांबळे, जोयडा तालुका युवा अध्यक्ष मारुती पाटील, सुहास देसाई, विनय देसाई आदी उपस्थित होते.
अबकारी खात्याची नवीन इमारत कधी पूर्ण होणार?
अनमोड येथे अबकारी खात्यासाठी 2017 साली नवीन इमारत बांधण्यास सुरुवात केली होती. परंतु, 2021 साल उजाडले तरी अजूनही इमारत अपूर्णच आहे. येथील अबकारी खात्यातील कर्मचाऱयांना पडक्मया झोपडीतच थांबावे लागत असल्याचे जोयडा येथे बैठकीवेळी पत्रकार निखिल असूकर यांनी आर. व्ही. देशपांडे यांच्या निदर्शनास आणून दिले. हे काम कधी पूर्ण होऊन अबकारी खात्याला इमारत स्थलांतरित करता येणार, असा प्रश्न उपस्थित केला. यावर तातडीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱयांना सदर इमारतीचे राहिलेले काम पूर्ण करून अबकारी खात्याला स्थलांतरित करण्याच्या सूचना केल्या आहेत.









