वार्ताहर/ मायणी
अनफळे (ता. खटाव) येथील विविध विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक चौगुले यांची तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र यलमर यांची सर्वानुमते निवड करण्यात आहे.
अनफळे विकास सेवा सोसायटीची यंदाची निवडणूक बिनविरोध पार पडली होती. माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱया अनफळे सोसायटीच्या चेअरमन, व्हा. चेअरमन पदाची निवडही बिनविरोध झाली.
नूतन चेअरमन अशोक चौगुले व व्हा. चेअरमन राजेंद्र यलमर यांचे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, प्रभाकर घार्गे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, हरणाई सूतगिरणीचे संस्थापक चेअरमन रणजितसिंह देशमुख, युवानेते सचिन गुदगे, अनफळे सरपंच सुनिता यलमर, उपसरपंच पमाबाई यलमर, सोसायटी सचिव सलीम मुल्ला, प्रल्हाद यलमर, माजी सरपंच राजेंद्र आडके, ग्रा. पं. सदस्य बाबासो आडके, शिवाजी वाडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.








