ग्रा.पं. प्रशासन व पोलीसांकडून टाळाटाळ होत असल्याने नाराजी
मौजे दापोली / प्रतिनिधी
दापोली तालुक्यातील मुरूड येथील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या अनधिकृत झोपडीवजा हॉटेल्सधारकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नसल्यामुळे ही कारवाई वारंवार पुढे जात आहे. या बंदोबस्ताला स्थानिक प्रशासन व पोलिस टाळाटाळ करत असल्याचे आता गावातून बोलले जात आहे. यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. तातडीने ही कारवाई न झाल्यास २६ जानेवारी रोजी उपोषणाला बसणार असल्याचे पत्र ग्रामस्थांनी दापोली पोलिस ठाणे व ग्रा. पं.ला देण्यात आले आहे. त्यामुळे आता तरी या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.









