प्रतिनिधी /बेळगाव
येथील अनगोळ-वडगाव मुख्य मार्गावर डेनेजचे झाकण व्यवस्थित बसविण्यात न आल्याचे निदर्शनास आले आहे. येथील विकासकामे अर्धवट ठेवण्यात आल्याने समस्या उद्भवली आहे. या अर्धवट कामांमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली असून धोकादेखील वाढल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून येथील डेनेज उघडे ठेवण्यात आले आहे. एखादा अपघात घडू नये यासाठी चारही बाजूने दगड आणि प्लास्टिकची पोती ठेवून संरक्षण देण्यात आले आहे. एक काम पूर्ण करण्यास प्रशासनाला अनेक महिन्यांचा कालावधी लागत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे येथील विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.









