प्रतिनिधी /बेळगाव
श्रावण महिन्यातील वरद लक्ष्मी शुक्रवारनिमित्त अनगोळ येथील ग्रामदेवता श्रीलक्ष्मी मंदिरात विशेष आरास करण्यात आली. श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी मंदिराच्या गाभाऱयात तसेच मंदिराला यानिमित्त सजविण्यात येते. शुक्रवारनिमित्त भाविकांनी मंदिर परिसरात देवी दर्शनासाठी गर्दी केली होती.
मंदिराला फुलांच्या माळांचे तोरण बांधले जाते. आकर्षक मंडपाचीही उभारणी केली जाते. यावेळी हत्तीचे मुखवटेही उभे करण्यात आले होते. त्यामुळे शुक्रवारी मंदिर परिसराला एक वेगळे स्वरुप प्राप्त झाले होते. मंदिराची आरास मोठय़ा उत्साहात पार पडली. त्यानंतर भक्तांनी मोठय़ा मनोभावे पूजा करून देवीचे दर्शन घेतले. या सजावटीसाठी आणि दिव्यांच्या रोषणाईसाठी महात्मा गांधी स्मारक येथे युवक मंडळ आणि देवस्थानचे पुजारी यांच्यावतीने ही आकर्षक पूजा बांधण्यात आली. यावेळी इतर भक्तांनीही सहकार्य केले. दर शुक्रवारी या मंदिरामध्ये आरास केली जाते आणि भक्तिभावाने सर्वजण दर्शन घेतात.









