बेळगाव/ प्रतिनिधी
अनगोळ येथे युवकांच्या दोन गटात झालेल्या जोरदार वादावादीनंतर हाणामारीचा प्रकार घडला. तसेच एकमेकांवर केलेल्या तुफान दगडफेकीत चार युवक जखमी झाले. या घटनेमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने अनगोळ परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
या हाणामारीत जखमी झालेल्या दोघा युवकांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये सूरज सुरेश बिर्जे (वय 30 रा. रघुनाथ पेठ ) आणि आकाश शंकर झंगरूचे (वय 23 रा. पाटील गल्ली, अनगोळ) यांचा समावेश आहे. आणखी एक युवक गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. संकेत सोरटेकर ( वय 23,रा. राजहंस गल्ली) असे त्याचे नाव असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. अनगोळ येथे सध्या सुरू असलेल्या ग्रामदेवता मरगाई देवीच्या यात्रेनिमित्त याठिकाणी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीत लावण्यात आलेल्या डॉल्बीच्या मुद्दय़ावरून वादाला प्रारंभ झाला. हा वाद विकोपाला गेल्यामुळे प्रकरण हातघाईवर आले. त्यामधून तुफान हाणामारी, दगडफेक असे प्रकार घडले. तसेच काही युवकांनी धारदार शास्त्रांचाही वापर केल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे नागरिकांची पळापळ झाली. पोलिसांना जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीमार करावा लागला. या घटनेनंतर अनगोळसह शहर परिसरात रात्री उशिरापर्यंत काही अफवा पसरल्या होत्या.
1) के. बी कुलकर्णी जन्मशताब्दी महोत्सवाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करताना अभिनेते नाना पाटेकर, उपस्थितांत विजय तमूचे, नितीन कपिलेश्वरकर, दिलीप चिटणीस, दत्ता









