उद्यमबाग पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी /बेळगाव
घराशेजारी लावलेली कार बाजूला काढ अन्यथा कारच्या काचा फोडू, अशी धमकी दिली. त्यामुळे यावेळी समजाविण्यासाठी गेलेल्या भावावरच रॉडने हल्ला केल्याने भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना अनगोळ येथे सोमवारी रात्री 12 च्या सुमारास घडली आहे.
यल्लाप्पा अर्जुन शिंदोळकर (वय 42, रा. भांदूर गल्ली, अनगोळ) असे त्या जखमी युवकाचे नाव आहे. संशयित आरोपी महेश महादेव शिंदोळकर (वय 30) याने हा हल्ला केला आहे. एका नातेवाईकाने कार लावली होती. ती कार काढा अन्यथा त्या कारच्या काचा फोडू, अशी धमकी महेशने दिली. त्यामुळे यल्लाप्पा हा समजाविण्यासाठी गेला. त्यावेळी जीवे मारण्याची धमकी देऊन महेशने रॉड घेऊन यल्लाप्पावर हल्ला केला. या घटनेत यल्लाप्पा जखमी झाला. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी यल्लाप्पाची पत्नी मानसी शिंदोळकर हिने उद्यमबाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी भा.दं.वि. 307 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.









