प्रतिनिधी बेळगाव :
वादळी वाऱयासह झालेल्या पावसामुळे अनगोळ भेंडीगेरी गल्ली येथे झाडाची फांदी पडून कारचे नुकसान झाले. सायंकाळी 4.15 च्या सुमारास ही घटना घडली. फांदी पडली तेव्हा जवळपास कोणी नसल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला असला तरी कारचे नुकसान झाले आहे.
विद्याधर पाटील यांची रेनॉल्ड क्विड ही कार घराबाहेर लावण्यात आली होती. सोसाटय़ाच्या वाऱयामुळे झाडाची फांदी तूटून ती थेट कारवर पडली. त्यामध्ये कारची काच व दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे.









