प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ येथील मराठी मुलींची शाळा क्र. 6 येथे आंतरराष्ट्रीय योग दिन व वृक्षारोपण असा संयुक्त कार्यक्रम करण्यात आला. युथ फॉर सेवा या संस्थेच्या माध्यमातून शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
शिक्षिका जयश्री पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. शाळा आवारात आंबा, चिंच, पेरू, फणस, सीताफळ, आवळा अशा रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी युथ फॉर सेवाचे जिल्हा समन्वयक संतोष खोत, विनित, निखिल, मनोज, सोनाली, वर्षा, शुभांगी, अस्मिता, केतकी, नंदा बसुर्तेकर, भुवनेश्वरी, मणतुर्गीमठ यांच्यासह इतर उपस्थित होते.









