प्रतिनिधी / बेळगाव
रेल्वे मार्गाच्या दुरूस्तीसाठी अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट बंद ठेवण्यात येणार आहे. मंगळवार दि. 5 रोजी रात्री 10 ते बुधवार दि. 6 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत रेल्वेगेट बंद ठेवण्यात येणार आहे. अनगोळमधून उद्यमबागला जाणारी सर्व वाहतूक या मार्गे जात असल्यामुळे त्या वाहनांना इतर मार्गांनी जावे लागणार आहे. नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन नैऋत्य रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.









