प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळ मुख्य मार्गावरील पथदीप दिवसांपासून बंद आहेत. या मार्गाचे नुकतेच काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. काही ठिकाणी साईडपट्टीचे काम सुरू आहे. परंतु पथदीप बंद असल्यामुळे संपूर्ण परिसरात काळोख पसरत आहे. यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवासी प्रवास करत आहेत. महानगरपालिकेच्या पथदीप विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे तक्रार करूनही पथदीप सुरू करण्यात आलेले नाहीत. स्मार्ट सिटीचे काम अद्याप सुरू असल्याने रात्रीच्या वेळी अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहेत.









