प्रतिनिधी /बेळगाव
गोवावेस येथे रस्त्यामध्ये पडलेला मोबाईल मालकापर्यंत पोहोचवून अनगोळच्या युवकांनी प्रामाणिकपणा दाखविला आहे. कोरे गल्ली, शहापूर येथील मयुरेश आनंदाचे यांचा मोबाईल शनिवारी सायंकाळी गोवावेसनजीक पडला. हा पडलेला मोबाईल मारुती गल्ली अनगोळ येथील सतीश जाधव व महेश बडिगेर यांच्या दृष्टीस पडला. काही वेळातच या मोबाईलवर मयुरेश यांचा फोन आला. सतीश व महेश यांनी मोबाईल सापडल्याचे सांगून ओळखपत्र दाखवून तो घेऊन जाण्यास सांगितले. मयुरेश यांना सॅमसंग कंपनीचा मोबाईल सुपूर्द करण्यात आला. या त्यांच्या प्रामाणिकपणाचे मयुरेश यांनी आभार मानले.









