”मुकुल वासनिक यांना काँग्रेस अध्यक्ष करा”
ऑनलाईन टीम / तरुण भारत
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष भारतातील सर्वात जुना राजकिय पक्ष आहे. त्यामूळे राष्ट्रीय काँग्रेसची स्थिती काय आहे. हे फार महत्त्वाचं आहे. कारण राष्ट्रीय काँग्रेस हा देशाच्या संपुर्ण भागात पोहोचला असुन एक वर्ग कायम राहीलेला आहे. मात्र गेल्या काही दिवसातील राष्ट्रीय काँग्रेसची स्थिती पाहता राष्ट्रीय काँग्रेस आपल्या कामगिरीने मतदाराला अपेक्षित काय आहे. आणि आपला पक्ष त्यासाठी करु शकतो ? यावर चिंतन बैठका होणे अपेक्षित असताना राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष कोण ? हा प्रश्न गेले कित्येक दिवस सुटलेला नाही. प्रश्न सुटला नसला तरी त्यावरुन काँग्रेससाठी चिंतेची बाब ही आहे कि, अध्यक्ष गांधी घरण्यातील असावा की नको यावरुन पक्षात मतभेद आहेत.
काँग्रेस गेली काही वर्ष अध्यक्षांशिवाय आपली वाटचाल करत आहे. मात्र पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर आलेले अपयश पाहता पुन्हा एकदा अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली आहे. सध्या सोनिया गांधी या पक्षाच्या हंगामी अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. मात्र सर्व निर्णय राहुल गांधीच घेत असल्याचा दावा नाराज गटातील नेत्यांकडून केला जात आहे. यात जी 23 या नाराज गटाने अध्यक्षपदासाठी मुकुल वासनिक यांचे नाव सुचवले आहे. अशी माहिती समोर येत आहे.
पाच राज्यातील निकालानंतर सोनिया गांधी यांनी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत जी 23 या नाराज गटाने गांधी कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीला अध्यक्षपद द्यावे अशी जुणीच मागणी लावून धरली आहे. यासाठी त्यांनी मुकुल वासनिक यांचे नाव पुढे केले आहे. पण हे नाव स्वीकारण्यात आले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या गटामध्ये आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, मनिष तिवारी, पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे काँग्रेसचा हा अंतर्गत वाद काँग्रेसला तोटा करतो मात्र तो कितपत होऊ द्यायचा हे राष्ट्रीय काँग्रेसवरच अवलंबुन असणार आहे.