प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्व सभापतींचा कार्यकाल हा एक वर्षाचा निश्चित केला आहे. उर्वरित अडीच वर्षाच्या काळात दोन- दोन सदस्यांना संधी मिळावी यासाठी ह फार्म्युला ठरवण्यात आला आहे. ठरलेल्या कालावधीत पदाधिकारी राजीनामे देतील अशी माहिती महाविकास आघाडीचे नेते गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी दिली.
16 जानेवारीस जिल्हा परिषदेच्या बांधकाम, शिक्षण, महिला बालकल्याण, समाजकल्यास समिती सभापतींची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सदस्य गोवा सहलीवर पाठवण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री पाटील यांनी वरील माहिती दिली. यावेळी खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, माजी आमदार डॉ,. सुजित मिणचेकर, सत्याजीत पाटील, अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.
ते म्हणाले, जिल्हय़ाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे ग्रामविकासासारखे महत्वाचे खाते आल्याने मागील अडीच वर्षाच्या काळाताली पूर्ण बॅकलॉक भरुन निघेल, कागल पूर्ण डेव्हलप झाल्याने ग्रामविकास मंत्री जिल्हय़ाकडे निशिचतपणे लक्ष देतील असा विश्वास व्यक्त केला. करवीर पंचायत समितीसाठी नविन इमारत बांधकामाचा तर हातकणंगले पंचायत समितीच्या उदघाटनाचा लवकरात लवकर मुहूर्त करावा अशी विनंतीही त्यांनी केली. ग्रामविकासाच्या निधी वाटपासंदर्भात जानकार सदस्यांनी लक्ष घालावे, थेट अनुदानाचा निर्णय राज्य पातळीवर असल्याने याबाबतचे निवेदन ग्रामविकास मंत्र्यांना द्यावे ते अपेक्षित निर्णय घेतील. एकजूट कायम ठेवून पदाधिकारी निवडी यशस्वी करुया असे आवाहन केले.









