वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाविरोधातील लढाईत केंद्र आणि राज्य शासनांनी चांगली
कामगिरी केली आहे. त्यामुळे 130 कोटी लोकसंख्या असणाऱया आपल्या देशामध्ये कोरोनाचा
प्रसार रोखण्यात लक्षणीय यश मिळाले आहे, अशा शब्दात काँग्रेसचे
नेते अधीर रंजन चौधरी यांनी केंद्र आणि राज्य सरकारांच्या कामगिरीचे सोमवारी कौतुक
केले. आपण कोरोनाविरोधात अशीच कामगिरी केली तर भारत विश्वनेतृत्त्व करू शकतो, असा विश्वासही
त्यांनी व्यक्त केला. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी मोफत
पोहचविण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी अधीर रंजन यांनी पत्राव्दारे पंतप्रधान
मोदींकडे केली आहे.









