ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वी जवळपास 3 हजार लोकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यामध्ये विधानभवनातील दोन कर्मचाऱ्यांसह 8 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही.
मुख्यमंत्र्यांच्या तब्बेत ठिक नसल्याचे यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होत आहे. अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक झाली. तर विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून ठिय्या मांडला. तसेच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या अधिवेशनात राज्यातील गुन्हे तसेच महिला सुरक्षा प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना विरोधक घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत. अधिवेशनात शक्ती कायद्याबाबतही महत्वाची चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते.








