अधिवेशनामुळे सर्वत्र रंगरंगोटी-दुऊस्तीची कामे सुरू
प्रतिनिधी/ बेळगाव
‘मंत्री येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ याची प्रचिती पुन्हा एकदा बेळगावकरांना येत आहे. येत्या आठवड्यात बेळगावमध्ये कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार असल्याने सर्वत्र रंगरंगोटी व दुऊस्तीची कामे केली जात आहेत. परंतु ती देखील केवळ मलमपट्टीच ठरत असल्याने हा दिखाऊपणा नेमका कुणासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दि. 19 ते 30 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ व आमदार बेळगावमध्ये दाखल होणार आहेत. यासाठी ज्या मार्गावरून मंत्री प्रवास करणार आहेत, त्या मार्गावरील रस्त्यातील खड्डे बुजविले जात आहेत. तसेच दुभाजकाला रंगरंगोटी केली जात आहे. येडियुराप्पा मार्गावरील मागील वर्षभरापासून साचलेला कचरा काढण्याचे काम गतिमान आहे. सुवर्णसौध रस्त्यावरील खड्डेही भरले जात आहेत. मागील 8 दिवसांपासून या कामाला सुऊवात करण्यात आली. त्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून दुऊस्तीचे काम करा, अशी मागणी नागरिकांकडून होत असतानाही खड्डेयांनी भरलेल्या रस्त्यातूनच वाहनचालक प्रवास करीत होते. सामान्य नागरिकांपेक्षा मंत्रिमहोदय महत्त्वाचे आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ही तर केवळ मलमपट्टी गांधीनगर येथील ब्रिजखाली मागील अनेक दिवसांपासून ख•s पडले होते. शनिवारी सकाळी हे खड्डे भरण्याचे काम केले. केवळ खडी टाकून त्यावर डांबराचा शिडकावा करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. हा दिखाऊपणा केवळ अधिवेशनासाठीच का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.









