ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही भाजप नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मुद्द्यावरून हे भाजप आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे आमदार उपस्थित होते.
दरम्यान, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणीवस यांनी अनेक मुद्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वीजदर वाढ, मराठा आरक्षण, महिला सुरक्षा, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास या प्रकरणावरून फडणवीस यांनी सभागृह दणाणून सोडले होते. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणार आहेत.