नवी दिल्ली
अदानी समुहाने कृष्णापट्टनम पोर्ट कंपनीच्या (केपीसीएल) ताब्यातील बंदर आपल्याकडे घेतले आहे. खास आर्थिक विभागाअंतर्गत 1200 कोटी रुपयांना अदानीने केपीसीएलचे कृष्णाट्टनम बंदर 75 टक्के वाटा घेत आपल्याकडे घेतले आहे. अदानी या बंदरावरील व्यवहारांमध्ये येणाऱया काळात वाढ करणार आहे. 2025 पर्यंत या बंदराची उलाढाल 50 कोटी रुपयांवर नेण्याची योजना कंपनीने आखली आहे. अदानी समुहाकडे पहिल्यापासून 11 बंदरे आहेत. 2020-21 सालात कंपनीचा बाजारातील वाटा 21 वरून 25 टक्क्यावर पोहचेल.









