वृत्तसंस्था/ मुंबई
मागील काही दिवसांपासून उद्योजकजगतामध्ये विविध टप्यांवर बदल होत असल्याचे पहावयास मिळाले आहेत. यामध्ये दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अदानी समुह यांनी वेगवेगळे व्यवसाय आपल्या हाती घेत आपला एक वेगळा ठसा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये दोन दिवसांपूर्वी रिलायन्सने फ्युचर समुहाचे किरकोळ व अन्य व्यवहार खरेदी केले आहेत. तर दुसरीकडे देशातील सहा विमानतळांचा ताबा घेणार आहे. या व्यवहाराच्या बातम्यांमुळे चालू आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी रिलायन्सच्या समभागांनी तीन टक्क्यांनी तेजी प्राप्त करत नफा कमाईची नोंद केली आहे.
अदानी समुहाने मुंबई विमानतळाची जीवीके कंपनीकडून हिस्सेदारी खरेदी करून ताबा हाती घेणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे सोमवारी अदानीचे समभाग 7.6 टक्क्यांनी वधारले तर बीएसई ग्रीन एनर्जीचे समभाग 7.65 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. तसेच सोबत अदानी पोर्डर्स ऍण्ड स्पेशल इकॉनॉमिक झोनचे समभाग 5.24 टक्के तर अदानी पॉवरचे समभाग 4.97 टक्क्यांनी वधारले असल्याची नोंद केली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजने किशोर बियाणीच्या फ्युचर समुहाचे किरकोळ, होलसेल, लॉजिस्टीक आणि वेयरहाऊसिंग व्यवसायांना खरेदी करणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे याचा सकारात्मक परिणाम म्हणून सोमवारी रिलायन्सचे समभाग बीएसईमध्ये 2.66 टक्क्यांनी वधारून 2,172 रुपयांवर झेपावल्याचे पहावयास मिळाले आहे









