नवी दिल्ली
मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या अदानी पॉवरमध्ये आपल्याच 6 सहकारी कंपन्यांचे विलीनीकरण होणार असल्याचे सांगितले जाते. सदरच्या प्रस्तावाला अदानीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.
बीएसईला यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे. या मंजुरीनंतर अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड, अदानी पॉवर राजस्थान लिमिटेड, अदानी पॉवर(मुंद्रा) लिमिटेड, उडुपी पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, रायपूर एनर्जी लिमिटेड व रायगड एनर्जी जनरेशन लिमिटेड या सहकारी कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे.









