नवी दिल्ली –
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने 75 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी स्टर्लिंग अँड विल्सन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत करार केला आहे. या प्रकल्पांतर्गत स्टर्लिंगमध्ये अदानी 100 टक्के वाटा खरेदी करणार आहे. स्टर्लिंग अँड विल्सन प्रायव्हेट लिमिटेड ही शापूरजी पालनजीतील समूह कंपनी आहे. तेलंगाणामध्ये 2017 मध्ये सदरचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. यातच अदानीने रस दाखवला आहे. तेलंगाणा सरकारबरोबर स्टर्लिंगचा वीज खरेदीसंबंधात दीर्घकालीन करार झाला आहे. हे पाहूनच अदानीने याबाबत नुकताच करार केला आहे. अंतर्गत आणि बाहय़विकासाच्याबाबतीतल्या संधी हेरण्याचे काम कंपनी करत असून 2025 पर्यंत 25 मेगावॅट क्षमतेची सौरऊर्जा निर्मिती करण्याचे ध्येय कंपनीने बाळगले असल्याचे अदानी ग्रीन एनर्जीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ विनीत जैन यांनी सांगितले.









