मुंबई \ऑनलाईन टीम
सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांच्या सुरक्षेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. अदर पूनावाला यांनी कोणतीही सुरक्षा मागितलेली नसताना त्यांना केंद्राने सुरक्षा दिली. त्यामागे काय दडलं आहे? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, अदर पूनावाला यांनी आधी भारतात जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं. त्यांना कुणी धमकी दिली हे केंद्र सरकारने सांगावं. पूनावाला यांनी कुणालाही सुरक्षा मागितली नाही. तरीही त्यांना सुरक्षा का पुरवण्यात आली. या सुरक्षेच्या मागे दडलंय काय? हे केंद्र सरकारने जाहीर करावं. पूनावाला यांना केंद्र सरकारने न मागताच सुरक्षा पुरवली आहे. केंद्राचे सुरक्षा रक्षक त्यांची रेकी करत आहेत काय?, असा सवालही त्यांनी केला.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, व्हॅक्सिनचे केंद्राने दोन दर ठरवले. यामागे टक्केवारीचं राजकारण काय आहे? असा सवाल करत त्यांनी केंद्र सरकार लसीकरणात अपयशी ठरल्याचे म्हटले. पूनावाला यांना देशात कोणीही हात लावणार नाही. त्यांनी देशासाठी आणि देशाच्या जनतेला वाचवण्यासाठी व्हॅक्सिनेशनचं काम भारतात करावं. तसेच पूनावाला यांच्यासोबत काँग्रेस आहे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस घेईल, असं त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आलं.
Previous Articleउत्तराखंडात मागील 24 तासात 71 मृत्यू ; 5,606 नवे कोरोना रुग्ण
Next Article देशात कोरोनाचा नवा म्युटेंट








