मुंबई \ ऑनलाईन टीम
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी आपल्याला धमक्या मिळत असल्याचा खुलासा केला होता. सध्या देशात यावरून चांगलीच खळबळ माजली आहे. अदर पूनावाला यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नसून हे धमकी देणारे नेमके कोण यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपाची मालिका सुरू झाली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातून अशा प्रकारच्या धमक्या त्यांना कोणीही देणार नाही कारण महाराष्ट्राची ती परंपराच नाही अशी प्रितिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, आदर पूनावाला यांनी धमकीबजद्दल काही वक्तव्य केले असेल तर निश्चितच प्रकरण गंभीर आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रातून अशा प्रकारच्या धमक्या त्यांना कोणीही देणार नाही. महाराष्ट्राची ती परंपराच नाही. किंबहुना महाराष्ट्राला सुद्धा या गोष्टीचा गर्व राहील की देशाची आरोग्यविषयक सुरक्षा निर्माण करणारे किंवा देशाला आरोग्यविषयक कवच-कुंडल देणारी जी लस आहे त्याची निर्मिती महाराष्ट्रात होते आहे.ही एक राष्ट्रभक्तीची भावना महाराष्ट्रात कायम राहील. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणतेही नेते, राजकीय पक्ष अशा प्रकारचा धमक्या देणार नाही. जर कोणी असे करत असेल तर केंद्र आणि राज्य सरकाने याचा खोलवर तपास करावा, असे देखील म्हणाले.
अदर पूनावाला यांची सुरक्षा करणं सर्वांची जबाबदारी आहे. ते देशासाठी काम करत असून त्यांची सुरक्षा करणं आपलं कर्तव्य असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.
Trending
- Testing1
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








