प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीमध्ये सक्रिय असणाऱया ‘अथर्व फोरयू इन्फ्रा ऍण्ड ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीकडून गुंतवणूकदारांना सुमारे 900 कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आह़े मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी 3 संशयिताना दहिसरमधून ताब्यात घेतले आह़े या कंपनीमध्ये रत्नागिरीतील अनेक गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणात रकमा गुंतवल्या आहेत. कंपनीचे रत्नागिरी कार्यालय दिर्घकाळ बंद असून या कारवाईने रत्नागिरीतील गुंतवणूकदार धास्तावले आहेत़
रत्नागिरी रेल्वेस्टेशन परिसरात या कंपनीचे शाखा कार्यालय उघडण्यात आले होत़े कंपनीकडून गुंतवणूकदारांना दुप्पट व तिप्पट रकमेच्या परताव्याचे आमिष दाखवण्यात आले होत़े व्यवसाय वाढवण्यासाठी अथर्व कंपनीकडून विविध स्तरावर एजंट्स नेमून गुंतवणूकदारांना विविध प्रलोभने दाखवली जात असत़ याला बळी पडत रत्नागिरी जिह्यामधून या कंपनीमध्ये कोटय़वधी रूपयांची गुंतवणूक करण्यात आल़ी मात्र गुंतवणूकदारांचा परतावा देणे अशक्य होऊ लागताच कंपनीच्या अधिकाऱयांनी जिह्यातून पोबारा केल़ा
महाराष्ट्रासह अनेक राज्यात या कंपनीच्या शाखा होत्य़ा फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात सुरूवात केल़ी त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु करण्यात आला होत़ा 22 ऑक्टोबर रोजी दहिसर परिसरातून या कंपनीचे अधिकारी सुरदास पाटील (48) सुखदेव म्हात्रे (41) व सुभाष नाईक (40) यांना अटक करण्यात आली होत़ी फसवणुकीची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी यापूर्वीच कंपनीचे संचालक शिवाजी नेफाडे, गणेश हजारे, सचिन गोसावी, मुकेश सुदेश यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होत़ी
आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या चौकशीमध्ये अथर्व कंपनीची राज्यभरात 40 कार्यालये असल्याची माहिती समोर आल़ी यामध्ये पनवेल, मुंबई, ठाणे, सांगली, रत्नागिरी येथील कार्यालयांचा समावेश आह़े या कंपनीने गोवा, राजस्थान, गुजरात कर्नाटक आदी राज्यामध्येही आपले हातपाय पसरले होत़े तेथील गुंतवणूकदारांना देखील चुना लावून या कंपनीचे अधिकारी फरार झाले होत़े
अथर्व इन्फ्रा कंपनी गेल्या 2 वर्षाहून अधिक काळ रत्नागिरीत कार्यरत होत़ी गुंतवणूकरदारांना आकर्षित करण्यासाठी देण्यासाठी कंपनी शैक्षणिक, आरोग्य, शेळीपालन, आर्युवेदीक प्रसाधने, औषधे आदी प्रकारांमध्ये गुंतवणूक करत असल्याचे सांगत अस़े सुरूवातीला गुंतवणूकदारांचा विश्वास मिळवण्यासाठी तशाप्रकारे गुंतवणूकही केली होत़ी मात्र आपले हीत साध्य होताच कंपनीकडून गाशा गुंडाळण्यात आल़ा अथर्व कंपनीची मालमत्ता जप्त करण्यात येत असून यामध्ये रत्नागिरीमधील मालमत्तेचाही समावेश आह़े त्या दृष्टेन पोलिसांकडून तपास करण्यात येत आह़े









